सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून समाजातील घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटना निरपेक्ष निर्भीड व परखड पणे साप्ताहिक यश संघर्ष वृत्तपत्राच्या माध्यमातून
जनतेसमोर मांडून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त व अडचणीत असलेल्या रंजलेल्या गांजलेल्या शोषित समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात पोटतिडकीने मांडून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार व मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या विकासासाठी संपादक सादिक शेख यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली असून अल्पअवधीत असंख्य वाचकांच्या मनात आदर युक्त घर निर्माण केलेल्या साप्ताहिक यश संघर्ष ने जनतेच्या व्यथा वेदना व अडचणी ची अचूक माहिती घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिक संपादक सादिक शेख यांनी केला आहे साप्ताहिक यशसंघर्ष केवळ वृत्तपत्र नसून ते समाजाचा आरसा म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात कार्यरत आहे . खरीखुरी पत्रकारिता जोपासत संपादक सादिक शेख यांनी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून आपल्या पत्रकारितेमधील एक नवा अध्याय जनतेसमोर ठेवला असून प्रतिकूल परिस्थिती असताना देखील आदर्श पत्रकारिता काय असते हे समाजाला दाखवून दिले आहे अशा युवा संघर्षवादी पत्रकार सादिक शेख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
शुभेच्छुक - यशवंत पवार
जेष्ठ पत्रकार तथा प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र
