दक्षिण सोलापुर तालुक्यात बोगस डॉक्टरवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.डॉ नीलम घोगरे ऍक्शन मोडवर




सोलापूर ( प्रतिनिधी)

कोणतेही वैद्यकीय व्यावसायिक पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. हसनसाब सैपनसाब मुजावर (वय ५०, रा. माळकवठा, ता. द. सोलापूर) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथे हसनसाब मुजावर हे कोणतेही वैधकीय नोंदणी आणि शैक्षणिक पात्रता नसताना रुग्णावर उपचार करीत होते. याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने संबंधित बोगस डॉक्टरवर कारवाई केली. हसनसाब मुजावर हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिसनर अॅक्ट १९६१ चे कलम ३३ नुसार शिक्षेस पात्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. रुग्णांवर बोगस उपचार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८ (४) महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम कलम ३३ प्रमाणे मंदुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद डॉ. निलम संपतराव घोगरे (यादव ) वय ५०, रा. १२८, बी. मुरारजी पेठ, पोलीस क्लबजवळ, सोलापूर  यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास अंमलदार गुरव हे करीत आहेत. मागील काही वर्षात जिल्हा  आहेत.परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments