जुळे सोलापूर येथे जबरी चोरी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल



सोलापूर - जुळे सोलापुरातील मुक्तेश्वर नगर जवळील ज्ञानेश्वर नगरातील पद्मावती प्रदीप चिल्ला यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तीन लाख 43 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी जिल्हा यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे 

 घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून जिल्हा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते रविवारी सकाळी 11 ते 2:15 च्या सुमारास चोरट्याने चिल्ला यांच्या घरात डाव साधला चोरट्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून दरवाजास लावलेले कुलूप तोडले व घरात प्रवेश केला त्यानंतर बेडरूम मधील लाकडी दरवाजातील झडप मध्ये ठेवलेले दागिने चोरट्याने चोरून नेले असे फिर्यादीत नमूद आहे घरात आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला त्यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील दागिने लंपास झाले होते त्यानंतर पद्मावती जिल्हा यांनी पोलिसात धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही पडताळणी केली आहे आता चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments