सोलापूर (प्रतिनिधी ) साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक यशवंत पवार यांनी दिनांक 20/9/2024 रोजी विजापूर रोडवरून सोलापूर शहरात येणाऱ्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मंडळअधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई ची तपशीलवार माहिती मिळावी म्हणून माहिती अधिकारात अर्ज केला होता. त्याच बरोबर दिनांक 4/ 10/2024 रोजी शमशापूर येथील बेकायदेशीर वाळू उपसा त्याच बरोबर वाहनजप्त निहाय मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई ची मागणी माहिती अधिकार अर्जात केली होती या संदर्भात तालुका उत्तर सोलापूर तहसील मधील जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी मागितलेली माहिती ही मोघम स्वरूपाची असल्याचे कारण देत यशवंत पवार यांचे दोन्हीही माहिती अधिकार अर्ज निकाली काढले आहेत. तसेच सदरची माहिती बाबत साध्या कागदावर अर्ज करण्याचा सल्ला दिला होता सदरची बाब अतिशय गंभीर असून मंडळ अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप साप्ताहिक कार्यसम्राट संपादक यशवंत पवार यांनी केला असून भ्रष्ट मंडळाधिकाऱ्यांना अभय देण्यासाठी जाणून बुझून माहिती न देता भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्यावर पांघरून घालण्याचा प्रकार दिसून येत आहे त्याच बरोबर उत्तर सोलापूर तालुका चे नायब तहसीलदार तथा जन माहिती अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे माहिती अधिकार कायद्याला हरताळ फासण्यात आला असून ही बाब अत्यंत खेदजनक व माहिती अधिकार कायदा पायदळी तुडवण्यासारखी आहे माहिती अधिकार अर्जात मागवलेली माहिती बाबत सविस्तर पणे वर्णन करून देखील ती मोघम असल्याचा जावई शोध या जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी लावला असून सर्वसामान्य माणसाला प्रशासनमधील कारभाराची माहिती मिळावी म्हणून हा कायदा केला गेला परंतु जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांचे दोन्हीही माहिती अधिकार अर्ज चक्क मोघम स्वरूपाचे असल्याचे कारण देत निकाली काढले आहेत ही बाब गंभीर असून माहिती दडवण्यासारखी असून याबाबत साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी दिनांक 22/10/2024 रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक तथा जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांच्या नायबतहसीलदार विरोधात केलेल्या तक्रारी ची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून तालुका उत्तर चे जनमाहिती अधिकारी तथा नायबतहसीलदार यांच्यावर चौकशी करून कारवाई करणे बाबत तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी मा उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.
0 Comments