फलटण (विक्रम वाघमारे ) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान फलटण मधून पालखी जात असताना *डसरॅक असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया (डराडो)* या संस्थे मार्फत वारकरी माऊलींसाठी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत जिंतीनाका फलटण येथे मोफत चहा व पाणी वाटप करण्यात आले. तेव्हा या संस्थेचे डायरेक्टर - डॉ. महेशकुमार खरात (8007481777), आणि ॲड. कांचनकन्होजाताई धोंडिराम खरात (9175281190) व सोबत कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच डराडो या संस्थेमार्फत आपण यापुढे ही अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम म्हणजेच विविध शैक्षणिक संकुले निर्माण करणे, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, मेडिकल कॅम्प घेणे व विविध रोगांवर संशोधन करून औषध निर्मिती करणे, विविध सरकारी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे, तसेच 1000 बेड्स चे रुग्णालय निर्मिती करून जनतेला मोफत उपचार / सेवा देण्याचा या संस्थेचा मानस आहे.
त्यासाठी आम्ही डायरेक्टर जनतेला, दानशूर व्यक्तींना आवाहन करीत आहोत की, या संस्थेला हे विविध कार्यक्रम पूर्णत्वास नेहणे कामी आपण मोलाचा मदतीचा हात देऊन वस्तू किंवा पैशांच्या स्वरूपात जास्तीत जास्त मदत करावी, जेणेकरून निस्वार्थ भावनेने जनतेपर्यंत वरील प्रमाणे सेवा पुरविणे सहज व लवकर सोपे होईल.
संस्थेला मदत करण्यासाठी संस्थेचे अधिकृत बँकेची माहिती पुढील प्रमाणे
Name: Union Bank of India, Phaltan A/C No: 695801010050461 IFSC Code:UBIN0569585 Bank हे आहेत. या व्यतिरिक्त संस्थेने दुसरा कोणताही नंबर जाहीर केलेला नाही याची नोंद सर्व दानशूर व्यक्तींनी घ्यावी ही विनंती.
0 Comments