Type Here to Get Search Results !

डॅशिंग पोलीस हवालदार सचिन बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट न्यूजची विशेष लेखमाला

 .



पोलीस दलाची आण बाण अन शान असलेले पोलीस हवालदार सचिन बाबर सोलापुरातील 

 फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत सचिन बाबर हे पोलीस दलातील एक आगळं वेगळं नाव शहरातील खून जबरी चोरी मोटारसायकल चोरी सह इतर अनेक बडे गुन्हे उकल करण्यात त्यांचा अतिशय महत्वपूर्ण सहभाग असून हद्दीत कायदा सूव्यवस्था त्याच बरोबर सामाजिक सलोखा राखण्यासाठी सचिन बाबर नेहमीच दक्ष अन सजग असतात


 समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याच बरोबर वंचित पिढीत घटकावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून नेहमीच सचिन बाबर काळजी व खबरदारी घेत असतात अन्यायपिढीत व्यक्ती ला कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ते समुपदेशनसह मार्गदर्शन करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याने ज्यांना आपल्यावर खरंच अन्याय झाला अशी माणसे पोलीस हवालदार सचिन बाबर यांना आवर्जून भेटून आपली कैफियत सांगतात, तसेच अडचणी  सांगतात 

पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादी अप्रिय घटना किंवा वादग्रस्त विषय आला की सचिन बाबर कुठे आहेत म्हणून अधिकारी विचारतात कारण सचिन बाबर तिथे आले की विषय संपतो अशी भावना अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात आज देखील आहे  


पोलीस हवालदार सचिन बाबर यांचे सर्वच समाजातील प्रतिष्ठित राजकीय सामाजिक लोकांबरोबर अतिशय चांगले संबंध असून सोलापूर शहरातील अनेक पत्रकारांबरोबर देखील मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे सचिन बाबर हे नाव कायम चर्चेत असते पत्रकारांमध्ये त्यांनी कधी भेदभाव केलेला नाही पत्रकार लहान असो वा मोठा पोलीस ठाण्यात गेल्यावर त्या पत्रकारांची जिवलग मित्राप्रमाणे विचारपूस करून चहा घेण्याचा ते नेहमीच आग्रह धरतात



 त्यामुळे सचिन बाबर यांचे अनेक पत्रकार बांधव मित्र आहेत वरकरणी जरी शांत संयमी अन हसतमुख वाटत असले तरी ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देण्यासाठी मात्र अत्यंत कठोर अन आक्रमक होतात. पोलीस हवालदार सचिन बाबर यांनी शहरातील विविध पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावले असून ज्या ठिकाणी नेमणूक झाली त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा आगळा वेगळा ठसा उमटवला आहे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक गुन्ह्यांची कौशल्यपूर्ण उकल केल्याने त्यांना अनेक वेळा सन्मानित करून पारितोषिके देखील देण्यात आली आहेत सोलापूर शहरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेतली असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे



 पोलीस हवालदार सचिन बाबर यांचा आज वाढदिवस असून कार्यसम्राट न्यूज वतीने त्यांना आभाळभर उदंड आयुष्याच्या शुभेच्छा.

                शुभेच्छुक 

                यशवंत पवार 

                     संपादक 

           कार्यसम्राट न्यूज सोलापूर 

💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.