सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील रस्त्याचे भव्य उद्घाटन सोलापूरचे आमदार मा. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका सौ. अलकाताई आनंद भवर यांच्या विशेष प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर चिखल, खड्डे व पाणी साचत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेविका सौ. अलकाताई आनंद भवर यांनी रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ करण्यावर भर दिला. रस्त्याच्या कामावर नागरिकांनी लक्ष ठेवावे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट आपल्याकडे तक्रार करावी. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद (नेता) भवर यांनी केली. त्यांनी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे समापन प्रा. रामेश्वर झाडे यांनी केले.
यावेळी राम काका भवर, राजू साखरे, सुभेदार मेजर धुळाप्पा शेंडगे, कार्तिक देडे, अविनाश पिंपळकर, चंद्रकांत विभुते, सूर्यकांत विभुते, प्रकाश भवर, आकाश भवर, अण्णाराव रणशूर, नंदकुमार शिवपुरे, नवनाथ पवार, प्रभाकर भालेकर, अमोल पवार, सौ. मनीषा शेंडगे, सौ. ज्योत्स्ना पोटे, शोभा खडसुळे, चव्हाण ताई, अर्पिता पवार, वाडेकर ताई, प्रगती ताई तिवारी, जगताप ताई, राणीताई कांबळे, प्रज्ञा तोडकरी, जांभळे काक, सुवर्णा विभुते, क्षमाताई माळी, संगीताताई साखरे, शुभांगी ताई ढोबळे, यांच्यासह तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे काम मार्गी लागल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख व नगरसेविका सौ. अलकाताई आनंद भवर यांचे आभार व्यक्त केले.
