Type Here to Get Search Results !

यहाँ कें हम हें राजकुमार ची पुन्हा सोलापूरांनी अनुभवली प्रचिती गणेशोत्सव मिरवणुका डीजे विना पारंपरिक वाद्याला पसंती : धडाकेबाज निर्णयाचे जोरदार स्वागत

 



सोलापूर (प्रतिनिधी ) गणपती बाप्पा हा मुलांचा देव असल्याची प्रचिती यंदाच्या गणेशोत्सवात सोलापूरकरांना आली. तमिळ भाषेत 'पिल्लयार' म्हणजे मुलांचा देव. यंदा सोलापूरच्या गणेशोत्सवात हा 'पिल्लयार' केवळ चिमुकल्यांचाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाचा केंद्रबिंदू ठरला. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या 'डीजेमुक्त सोलापूर' या लोकचळवळीचा सर्वांत मोठा आणि थेट परिणाम यंदाच्या ११ दिवसांत अनुभवायला मिळाला. कानठळ्या बसविणाऱ्या डीजेच्या दणदणाटातून मुक्त झालेल्या रस्त्यांवर यंदा आरत्या घुमल्या, डोल-ताशे दुमदुमले आणि चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांचा उत्साह खुलला.


गल्लीबोळातील आरत्यांमध्ये सहभागी झालेले बालगोपाल विसर्जन मिरवणुकीतील तालावर फुगड्या उत्साहाने नाचणाऱ्या युवती आणी मिरवणूक पाहण्यासाठी आवर्जुन बाहेर पडलेले जेष्ठ या साऱ्यांच्या सहभागाने यंदाचा गणेशोत्सव 'काही तरुणांचा' न राहता खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाचा लोकोत्सव झाल्याचे चित्र सोलापूरने अनुभवले.


या बदलाचे ठळक प्रतिबिंब आजच्या विसर्जन मिरवणुकांमध्येही दिसले. शहरात सलग दुसऱ्या


वर्षी एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने डीजेचा वापर केला नाही. दुपारी चारनंतर विविध मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. गावठाण भागात मधला मास्ती आणि माणिक चौकातून मिरवणुका निघाल्या. डीजे डॉल्बी लेझर लाईट नसल्याने एक वर्षाच्या बालकापासून ८० वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले.


मानाच्या कसबा गणपतीची पालखी सुरुवातीला निघाली. भव्य लेझीम पथकात शेकडो तरुण सहभागी झाले. आमदार विजयकुमार देशमुख यांनीही लेझीममध्ये सहभाग घेतला, आजोबा गणपती मंडळाचे ढोल पथक आकर्षक ड्रेसकोडमध्ये सहभागी


झाले होते. लाल तालीम गणेश मंडळाने पारंपरिक शिंगवादनासह लेझीम सादर केली. आकर्षक बाहुली कलावंतांनीही मिरवणुकीत रंग भरला. पत्रा तालीम, पाणीवेस आणि मंगळवेढा तालीम मंडळांच्या लेझीम पथकांनीही लक्ष वेधून घेतले,


डीजेमुक्तीचे सर्व मंडळांनी स्वयंस्फूर्तनि पालन केले. लेझीम पथकांसमोर दोन स्पीकरचे बेस वापरण्यात आले; मात्र डोजेचा दणदणाट टाळण्यात आला. लेझरऐवजी पांढऱ्या रंगाचे दिवे वापरण्यात आले. सनई चौघडा, संबळ, कर्नाटकी ढोल, बेंजो पार्टी, ताशा यांसारख्या पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत रंग भरला 

 हजारो तरुण-तरुणींनी लेझीम, ढोल टिपरी, झांज आदी पथकांत सहभागी होत उत्साहाला नवा आयाम दिला. अंदाजे पाच हजारांहून अधिक तरुण-तरुणी मिरवणुकांमध्ये सहभागी झाले. डीजेमुळे होणारा कर्णकर्कश त्रास नसल्याने पालकांनी


चिमुकल्यांना सोबत आणले, महिला आणी ज्येष्ठांनीही मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख


आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी विविध


मंडळांना भेट देऊन कार्यकत्यांचा उत्साह वाढविला. आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पहाटे साडेसात वाजता संपली.

एकंदरीत यहाँ कें हम हें राजकुमार या लोकप्रिय डॉयलॉग ची सोलापूरकरांना पुन्हा एकदा प्रचिती आली असून डीजे मुक्ती चा राज्यात इतिहास निर्माण करणाऱ्या युवा डॅशिंग व दमदार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे सोलापूरकर मनापासून अभिनंदन करत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.