सोलापूर (प्रतिनिधी) पोलीस आणी नागरिकांमध्ये समन्वय असावा पोलिसांशी दिलखुलास संवाद व्हावा सामाजिक सलोखा वाढवण्यात नागरिकांची पोलिसांना मदत व्हावी पोलीस आणी नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सुसंवाद साधून गुन्हेगारी रोखणे कायदा सूव्यवस्था राखणे गुन्हेगारांची माहिती तात्काळ पोलिसांना देणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी /अंमलदारांच्या सकारात्मक बातम्या करणे पोलीस दलाचे मनोबल वाढवण्याच्या सातत्याने प्रयत्न करणे
पोलिसांविषयी असलेली भीती दूर करणे या करिता पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असून पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्षपदी बसवराज हमाले यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांचा पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी जैद बागवान इत्यादी उपस्थित होते.
