Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार इलियास सिद्दीकी यांना जाहीर




सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी सन्मान चिन्ह सन्मान पत्र विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार युवा पत्रकार इलियास सिद्दीकी यांना जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली आहे 


       इलियास सिद्दीकी यांचा परिचय

 पत्रकार इलियास सिद्दीकी यांचे शिक्षण एम ए (पत्रकारिता जन संज्ञापण) ते जनशक्ती न्यूज चे संपादक म्हणून काम करत असून त्यांना तब्बल पत्रकारिता मधील 30 वर्षांचा अभ्यास असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नाची जाणीव आहे 


पत्रकारिता, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक विषयांवरील लेखन अशा विविध क्षेत्रांत गेल्या तीन दशकांपासून सातत्याने कार्यरत असलेले इलियास इक्बाल सिद्दिकी हे मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.


पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये पत्रलेखनापासून त्यांनी आपल्या लेखनप्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर विविध स्थानिक वृत्तवाहिन्यांसाठी व्हॉइस ओव्हरचे काम केले. सध्या ते ‘जनशक्ती न्यूज’चे संपादक म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, स्थानिक समस्या आणि जनहिताचे विषय प्रभावीपणे मांडत आहेत.

        साहित्य व रंगभूमी

पत्रकारितेसोबतच साहित्य आणि रंगभूमीशीही त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे. त्यांनी चार मराठी एकांकिका स्वलिखित केल्या असून, तीन हिंदी एकांकिकांचे मराठीत अनुवाद केले आहेत.


राज्यस्तरीय मराठी नाट्य स्पर्धेत त्यांच्या अभिनयाची दखल घेत शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.

सामाजिक व पर्यावरणीय कार्य

समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक विषयांवर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावी स्टोरीज केल्या आहेत. सामाजिक प्रश्न तसेच पर्यावरण संवर्धन या विषयांवर त्यांनी लघुपट लेखन केले आहे.


त्यांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय विषयावरील एका लघुपटाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पत्रकारितेची भूमिका


पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून, सामान्य माणसाचा आवाज प्रशासन आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे, या भूमिकेतून इलियास इक्बाल सिद्दिकी गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

लेखन, वृत्तांकन, व्हॉइस ओव्हर, रंगभूमी, लघुपट लेखन आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.