सोलापूर (प्रतिनिधी )
मुळेगाव गोळीबार प्रकरणातील आरोपींना पिस्टल पुरविणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी अटक केली. आरोपीकडून आणखी एक पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.
१५ जुलै रोजी रक्कम लुटण्याच्या उद्देशाने एजाज तांबोळी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक करून एक पिस्टल, सत्तूर, इरटिका कार व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या
अटक केलेल्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक १०, सोलापूर येथे हजर केले असता न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.
सदर ची कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके, सहायक पोलिस उपनिरीक्षक विवेक सांजेकर पोलिस हवालदार राहुल महिंद्रकर शशी कोळेकर, अनंत चमके महेश कटकदौंड, फिरोज मियावाले पैगंबर नदाफ आणि फिरोज बारगीर यांनी कारवाई केली.
