Type Here to Get Search Results !

ऑपरेशन पहाट अंतर्गत ३० खेळाडूंना सोलापूर तालुका पोलिसांकडून ट्रॅक पँट व टी-शर्टचे वितरण

 



​सोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन पहाट' या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून तळेहिप्परगा व मार्डी येथील ३० खेळाडू विद्यार्थ्यांना ट्रॅक पँट आणि टी-शर्टचे वितरण करण्यात आले. सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते हे साहित्य वितरित करण्यात आले.

​सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून 'ऑपरेशन पहाट'अंतर्गत विविध सामाजिक व क्रीडाविषयक उपक्रम राबवले जात आहेत. याच अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ३० गरजू व गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करून त्यांच्या भावी वाटचालीस पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या.

​हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस नाईक अनंत चमके यांनी आयोजित केला होता.

​यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम प्रवीण जर्दे सुनील मोरे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता सुपे सिमा डोंगरीतोट तसेच मार्डी व तळेहिप्परगा येथील पोलीस पाटील तळेहिप्परगा येथील मेघराज काळे आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे इतर पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.