Type Here to Get Search Results !

दुहेरी खूनातील चोरीचे दागिने घेणारा मुबंईतून अटकेत एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी

 



सोलापूर (प्रतिनिधी ) एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध दांपत्याचा खून झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयितांनी खून केल्यानंतर कपाटातून चोरलेले दागिने विकले होते. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा माल खरेदी करणाऱ्या संशयिताला मुंबईत बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २२ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कुमठा नाका परिसरातील स्वागतनगर रोडवरील महादेव पांडुरंग मंचाळ आणि रंगम्मा महादेव मंचाळ या वृद्ध दांपत्याला मूलबाळ नव्हते. मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्या नातेवाइकांसोबत वारंवार वाद होत होते. याच रागातून राहुल रामचंद्र मंचाळ (वय २६) आणि विकास रामचंद्र मंचाळ (वय २३) या दोन पुतण्यांनी या वृद्ध दांपत्याचा खून केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता. दोन्ही मुख्य संशयितांना आधीच अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. परंतु, संशयित राहुल आणि त्याचा भाऊ विकास यांनी खून केल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने चोरून विकले होते. विकासने दागिने त्याचा मित्र साहिल दादा शेख (रा. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडे दिले होते. खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांनी साहिल शेख याला अंधेरीतून ताब्यात घेतले. ही कामगिरी 

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार, पोलिस निरीक्षक संगीता पाटील, गुन्हे प्रकटीकरणाचे उपनिरीक्षक अल्फाज शेख, हवालदार एकनाथ उबाळे, मंगेश गायकवाड, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, संदीप काळे, सुहास अर्जन, प्रफुल्ल जानराव, नागेश चव्हाण, कुमार बोल्ली, शिवशिंगवाले, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.