सोलापूर (प्रतिनिधी ) दि.१०/०६/२०६ रोजी फिर्यादी सौ. प्रकृती कृष्णाप्रसाद रा. मुदतमिलनगर मालुमिचमपट्टी जि.क राज्य तामिळनाडू यांचे वडील कृष्णाप्रसाद व्ही हे हैद्राबाद येथुन सोलापूर मार्गे सातारा येथे जात सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथील फलाट क्रं. २३ चे बाजुस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन कशाच्या तरी सहयाने डोक्यात मारुन जिवे ठार मारले आहे दिलेल्या तक्रारी वरून दि.११/०६/२०२६ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४९४/२०२६ भा. न्या. संहिता कलम १०३ गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे करीत आहेत.
सदर गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम राजकुमार . पोलीस उप आयुक्त .प्रितम यावलकर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हा आरोपीचे नांवे निष्पन्न करुन अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या फौजदार चावडी पोलीस ठाणे कडील डी. बी. पथकाचे सपोनि/संजय क्षिरसागर व त्यांचे पथक यांनी गुन्हयाचा तपास करत त्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून आरोपीतांची नांवे निष्पन्न केले आरोपीच्या ठाव ठिकाण्या बाबत गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढुन ०१) कुणाल किसन कांबळे, वय-२१ वर्ष, रा. रमाबाई आंबडेकर नगर, न्यु बुधब सोलापूर, ०२) अमन सुधाकर जेटीथोर, वय-२१ वर्ष, रा.आम्रपाली चौक, न्यु बुधवार पेठ, सोलापू दि.११/०६/२०२६ रोजी सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली विधीसंघर्षग्रस्त बालक यास स .११/०६/२०२६ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/संजय क्षिरसागर व पथकाने अवघ्या २४ तासात तपास केला आहे.
सदरची उत्कृष्ट कामगीरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उप (परिमंडळ) .प्रितम यावलकर सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर पोकों/अजय चव्हाण, पोकॉ/विनायक जाधव, पोह/जगदीश हुल्ले, पोकॉ रवि धेंडे, पोकों/पंकज पोकॉ/विनोद पुजारी, पोकॉ/स्वप्नील मोरे, पोकॉ/नितीन मोरे, पोकॉ कुमार शेळके, पोकॉ शशिकांत दराडे पोकॉ/नानासाहेब सलगर, चालक पोकॉ/पाटील यांनी केलेली आहे..
