Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखा, ग्रामीणची कामगिरी परराज्यातुन अंमलीपदार्थ गांजा विक्री करण्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी जेरबंद एकुण 36 किलो 270 ग्रॅम असा एकुण 7,55,400 रु किमतीचा गांजा हस्तगत




सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी

यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक

संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हा मध्ये अंमली पदार्थ गांजा ची वाहतुक व विक्री करणारे यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध अंमली पदार्थ विक्री व वाहतूकीबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास अंमली पदार्थ गांजा व ड्रग ची वाहतुक व विक्री करणाऱ्या व्यक्ती वर कारवाईच्य सुचना दिल्या होत्या.

सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकातील स्थानिक पोहेकॉ/ मोहन मनसावाले यांना गोपणीय बातमीदारामार्फत , इसम सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे दोघे जगदलपुर, राज्य छत्तीसगड येथुन अंमली पदार्थ गांजाची 

 विक्री करण्याकरीता 

बोरामणी येथील असलेल्या हॉटेल वैष्णवी जवळ

येणार असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाली. 

. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी एन.डी.पी.एस कायद्यातील तरतुदीनुसार सापळा रचून हॉटेल वैष्णवी येथे दोन इसम दोन मोठया बॅगासह उभे असल्याचे दिसले. संशय आल्याने, त्यांना जागीच पकडले

(1) सचिन लक्ष्मण बनसोडे, वय 39 वर्षे, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर( 2)एकनाथ नामदेव लेंढवे, वय 33 वर्षे, रा. मेथवडे, ता. सांगोला जि.सोलापूर यांना अटक केली त्यांच्या ताब्यातील दोन्ही बॅगांची तपासणी केली असता निळ्या रंगाच्या 02 पिशवीतून 36 किलो 270 ग्रॅम वजानाचा अंमली पदार्थ गांजा, एकूण 7,25,400 रु. किंमतीचा अंमली पदार्थ गांजा व 30,000/- रु. किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 7,55,400/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 सदरचा अंमली पदार्थ गांजा हा जगदलपूर राज्य छत्तीसगड येथून विकत आणला असून तो अंमली पदार्थ गांजा इसम नामे 3) अनिल लक्ष्मण रोंगे, रा. खर्डी, पंढरपूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर यास विक्री करणार असल्याचे सांगितले अनिल रोंगे याची माहिती काढून गुन्हयाचे कामी मोहोळ येथून अटक करण्यात आली  

तरी वरील तीन्ही आरोपीतांविरुध्द पोहेकॉ/ मोहन मनसावाले यांनी फिर्याद दिल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 318/2026 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय 1985 चे कलम 8(क), 20(ब) ii(क), 29 चे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ज्ञानदेव वाघ स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करीत आहे. अटक आरोपीनां न्यायालयात हजर केले असता त्यांना 09/06/2026 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ सपोनि भिमगोंडा पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतीश बुरकुल यांनी बजावली आहे.

सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 318/2026 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय 1985 चे कलम 8(क), 20(ब) ii(क), 29 चे अन्वये दाखल गुन्हयातील अटक आरोपी नांवे 

1) सचिन लक्ष्मण बनसोडे, वय 39 वर्षे, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर

 2) एकनाथ नामदेव लेंढवे, वय 33 वर्षे, रा. मेथवडे, ता. सांगोला जि.सोलापूर 

3) अनिल लक्ष्मण रोंगे, रा. खर्डी, पंढरपूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.