सोलापूर (प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील अक्कलकोट तालुका मध्ये अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीकीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे अक्कलकोट तालुका मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे अक्कलकोट तालुका मध्ये बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत अक्कलकोट तालुका मध्ये बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षापासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेडे कोणतेही प्रयत्न करीत नाहीत या बाबत पत्रकार अमोल कुलकर्णी दिनांक २५/९/२०२५ रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना देखील लेखी पत्र दिले असून या बाबत अद्याप अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नाही अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात डॉ अश्विन करजखेडे चालढकल करत असल्याने पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी मा उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांची दिनांक 25/11/2025 रोजी भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.त्याच बरोबर बोगस डॉक्टरवर कारवाई न केल्यास आंदोलन चा इशारा देखील देण्यात आला होता . अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टरांना डॉ करजखेडे पाठीशी घालत असल्याचा आरोप अमोल कुलकर्णी यांनी केला असून डॉ करजखेडे यांच्यावर कारवाई करा म्हणून पूनम गेट सोलापूरयेथे बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे.
