सोलापूर (प्रतिनिधी) भविष्यातील संभाव्य
हल्ले रोखण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापुरात १ डिसेंबरपर्यंत ड्रोन वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात शहर हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्राचा असामाजिक तत्त्वांकडून वापर होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षास्थळांना धोका होऊन सामाजिक शांततेचा भंग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शहर हद्दीत कोणालाही विना परवाना
ड्रोन किंवा तशा यंत्राचा वापर करता येणार नाही, असा आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
