सोलापूर (प्रतिनिधी ) उघड्या घरातून दोन तोळे सोने व रोख रक्कम असा तीन लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले, तिच्याकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला. हा गुन्हा जेलरोड पोलिसांनी चोवीस तासात उघड केला आहे. आस्मा परवीन आरिफ जमादार (वय ४० रा. शास्त्री नगर सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तीच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी मिळाली व महिला सराईत गुन्हेगार नसल्याने पोलिसांनी तीस नोटीस देऊन सोडून दिले आहे.
निजामुद्दीन इब्राहिम विजापुरे (वय २३, रा. रा. राबिया अपार्टमेंट, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मावस बहिण आस्मा
यांच्यावर गुन्हा दाखल होता. अस्मा ही एक महिन्यापासून विजापूरे यांच्या घरात राहण्यासाठी होती. घरातील सर्व काही तिला माहित होते. तीने घरातील दोन तोळे सोने व ८० हजाराची रोख रक्कम असा एकूण ३ लाखांचा ऐवज लंपास केला होता. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी कळाल्याने पोलिसांत फिर्याद दिल्याने जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल होता.
या महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तीने दोन तोळे सोने व ८० हजार रुपये असा एकूण ३ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली. तो मुद्देमाल जेल रोड पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा २४ तासात उघडकीस आणल आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहा पोलिस निरीक्षक संदीप पाटील मपो अंमलदार अनुराधा गुत्तीकोंडा सफो एम. नदाफ गजानन कणगिरी पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड इकरार जमादार उमेश सावंत युवराज गायकवाड कलप्पा देकाणे संतोष वायदंडे विठ्ठल जाधव यांनी केली.
