Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) लागू पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांची माहिती.




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलने ,निदर्शने इ. होत असतात तसेच शहरात आगामी काळात दिपावली, श्री लक्ष्मी कुबेर पुजन, दिपावली पाडवा, भाऊबीज इ. सण उत्सव संपन्न होणार आहेत, तसचे वक्फ अध्यादेश ,मराठा ओबीसी, व धनगर आरक्षण इ. माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. याकरीता पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरच्या हद्दीत दिनांक- 12 ऑक्टोबर 2025 रोजीचे 00.01 वाजलेपासून ते दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (अ ते फ) चे आदेश लागू करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

  या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे मिरवणुका, सभा, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य  

  या हुकुमाचे खंडन अ ते फ ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहुन सदरचे आदेश लागू पडणार नाहीत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.