Type Here to Get Search Results !

आरोग्य विभागाचे ना भय ना भीती ना डिग्री ना परवाना तरीही गोदूताई नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांचा चालतोय व्यवसाय जोरात.




सोलापूर (प्रतिनिधी) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण द‌गावण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवीन विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णादेखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी मा जिल्हा आरोग्य अधिकारी त्याच बरोबर तालुका आरोग्य अधिकारी यांनी यांनी प्रयत्न करावेत तसेच वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार हे सोमवार दिनांक 4/8/2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन गेट या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत असून या बाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी या आंदोलन कडे पाठ फिरवल्याने नवीन विडी घरकुल मधील बोगस डॉक्टरांना नेमका आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला असून आंदोलनकर्ते यशवंत पवार गेली चार दिवसापासून आंदोलन करत आहेत बोगस डॉक्टर प्रकरणी एका पत्रकारांवर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न नक्कीच निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.