सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या दहा वर्षपासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडी चा अभ्यास करून समाजातील वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून नेहमीच प्रशासन दरबारात बाजू मांडून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या साप्ताहिक कार्यसम्राट या वृत्तपत्रा चे नूतन सोलापूर शहर प्रतिनिधी श्रीनिवास (सौडप्पा ) पेद्दी व सागर सब्बन यांचा साप्ताहिक कार्यसम्राट चे जेष्ठ पत्रकार कलीम शेख व आन्सर तांबोळी यांच्या हस्ते ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी संपादक यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी रमेश अपराध अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
