Type Here to Get Search Results !

अट्टल घरफोड्या मनशा काळे अखेर जेरबंद पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची धमाकेदार कामगिरी सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे फरार




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर, धाराशिव आणि पुणे अशा तीन जिल्ह्यात १५ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे (वय ४२, रा. भारनिमगाव, इंदापूर) याला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख सहा हजार रुपयांचे दागिने व एक लाख ८३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर तालुका, मोहोळ, माळशिरस, टेंभुर्णी, कुर्दुवाडी, अकलूज व पंढरपूर तालुका या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही दिवसांत वारंवार घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. स्थानिक पोलिस चोरट्यांचा शोध घेत

होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांच्या पथकावर या गुन्ह्यांची जबाबदारी सोपविली. त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार विजयकुमार भरले यांना चोरट्याबद्दल खबऱ्याकडून माहिती मिळाली. मनशा काळे हा अकलूज-टेंभुर्णी रोडवरील अकलूज चौकात वावरत असल्याचे खबऱ्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडले. त्याने राम काळुराम भोसले व श्याम 

काळुराम भोसले यांच्या मदतीने या घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, अश्विनी गोटे, पल्लवी इंगळे, दीपाली जाधव, अन्वर अत्तार, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, सुनंदा झळके, दिलीप थोरात व व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.