Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात वाढली हातभट्टीची नशा हात भट्टी मुळे पती गेला मुलगाही त्याच वाटेवर धाब्यावरन खूले आम दारू विक्री सुरू मंथली नावाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साफ दुर्लक्ष.




साेलापूर (प्रतिनिधी)

सोलापूर जिल्ह्या गावागावात सहजपणे मिळणाऱ्या हातभट्टीमुळे राज्यभर ओळखला जातो.


आई-वडिलांची म्हातारपणाची काठी म्हणजेच तरुण मुले हातभट्टीच्या आहारी जात आहेत.

*गावात पोलीस गेल्यावर त्यांना ते तरुण रस्त्यात कोठेही पडलेले दिसतात*.

             *तरीसुद्धा*, 

*अवैध हातभट्टीची विक्री खुलेआम सुरू आहे हे विशेष*. 


*पती हातभट्टीच्या व्यसनातून आजारी पडून मृत झाला* आणि 

*आता मुलगाही त्याच वाटेवर असल्याची व्यथा दक्षिण सोलापुरातील विंचूर गावातील विधवा महिलेने प्रसार माध्यमां कडे मांडली*.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख जून २०२३ मध्ये मतदार संघात गावभेट दौरा करीत होते. 

त्यावेळी तालुक्यातील विंचूर, कुसुर, बोळकवठे, सुलेरजवळगे, फताटेवाडी अशा ठिकाणच्या महिलांनी दोनदा निवेदने दिली. 

त्यावेळी आमदार देशमुख यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यास फोन लावून जाब विचारला आणि दारू विक्रेत्यांवरील कारवाईची सूचनाही केली.

 मात्र, काही दिवसांनी परिस्थिती 'जैसे थे'च झाली.

विंचूर येथील महिलेच्या पतीला गावात सहज मिळणाऱ्या हातभट्टीचे व्यसन लागले.

 कामधंदा सोडून तो सतत हातभट्टी पित होता.

 काही वर्षांतच पतीने जगाचा निरोप घेतला.

 मुलगा मोठा होत असल्याने पतीच्या निधनाचे दु:ख ती महिला काही वर्षात विसरली.

 पण, ज्याचा आधार वाटला तोही हातभट्टीच्या आहारी गेल्याने ती हतबल झाली आहे.

 आमदारांकडे महिलांनी मागणी केली,

 गावकऱ्यांनी पोलीसांना निवेदन दिली,

 तरी हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने जिल्हाभरातील हजारो महिला चिंतेत असल्याची सद्य:स्थिती आसुन आनेकाचे संसार रसत्यावर येत आहेत. मंगळवेढ्यात

 ढाब्यावरून दारू विक्रिला ऊत मंगळवेढा

शहर परिसराजवळ आनेक ढाबे आसुन या ढाब्यावर मध्यरात्री पर्यंत खूले आम दारू विक्री सुरु असते

 जेवणाच्या नावाचे बाेर्ड केवळ शाेभेला उरले आहेत.

सर्व दारू व्यवसायाच्या वसुलीसाठी झिराे कर्मचारी नेमुन मंथली वसुली करून ऐका लायसन दारू विक्रेताकडे ठेवली जाते दारू उत्पादन विभागाचे आधिकारी महिन्याकाठी येऊन घेऊन जातात.

शासनाने दारू ला आळा घालन्यासाठी दारू उत्पादन शुल्क विभाग नेमला आसताना धूळ फेक करुन स्व.ताच्या तुंबडंया भरल्या जात आहेत,

शासनाने मंथलीला चटावलेल्या आधिकार्‍यांना गव्हातील खडे बाजुला काढल्या प्रमाणे काढून थेट कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

कारखाना राेडवर बायपासला सकाळी व संध्याकाळी माेठ्या घराण्यातील महिला वर्ग फिरायला जाताे 

येथे हाँटलच्या नावाखाली मुबलक देशी विदेशी दारू विक्रीमुळे पिणारे रसत्यावर झिंगत आसतात याचा त्रास महिला वर्गांना हाेताे.

 स्थानिक शहर बिटच्या पाेलीसांना याची कल्पना आसताना ते त्या हाँटेलकडे महिन्याकाठी जाऊन खिसे गरम करून येत असल्याच्या तक्रारी आहेत

 दामाजीच्या पुढे कर्तव्य विसरत आसल्याने दारू व्यवसायाला बरखत येऊन आनेकांचे संसार उध्दवस्त हाेत आहे 

याला सर्वस्वी राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पाेलीस जबाबदार आसल्याचा आराेप महिला वर्ग व सुज्ञ नागरीकामधून पुढे येत आहे.

*शासकीय यंत्रणेकडे सर्व माहिती तरी ही हाताची घडी अन तोंडावर बोट

सोलापूर जिल्ह्यातील ५४ ठिकाणी हातभट्टी तयार केली जाते आणि त्याची वाहतूक-विक्री जिल्ह्यातील मोठ्या ३५० गावांमध्ये होते, ही माहिती पोलीसांकडीलच आहे.ग्रामीण पोलिसांचे

         *ऑपरेशन परिवर्तन*

 आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 'हातभट्टीमुक्त गाव'अंतर्गत दोन्ही यंत्रणांनी ही माहिती यापूर्वीच संकलित केली आहे.

 त्या गावांमध्ये ग्रामीण पोलीसांचे बीट अंमलदार देखील आहेत. 

तरीसुद्धा, विक्रेत्यांवरील कारवाईत ना सातत्य ना हातभट्ट्यांवर छापे, 

         अशी स्थिती आहे.

*६ तालुक्यांत सर्वाधिक हातभट्ट्या*

पोलीसांकडील माहितीनुसार माहितीनुसार,दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ११, 

उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी नऊ, 

करमाळा तालुक्यात सात 

आणि अक्कलकोट व सांगोला तालुक्यात प्रत्येकी सहा ठिकाणी नेहमीच हातभट्टी पेटलेल्या असतात. 

याशिवाय पंढरपूर तालुक्यात तीन आणि मोहोळ तालुक्यातील दोन ठिकाणी देखील हातभट्ट्या आहेत. 

मात्र, सध्या अधिकाऱ्यांना *ऑपरेशन परिवर्तन* व

        *हातभट्टीमुक्त गाव* 

या अभियानांचा विसर पडल्याने हातभट्टी चालक बिनधास्तपणे गावागावात हातभट्टी पोच करीत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.