Type Here to Get Search Results !

धनादेश न वटल्याप्रकरणी एका महिलेची निर्दोष मुक्तता




सोलापूर (प्रतिनिधी)- फिर्यादीस दिलेले धनादेश न वटल्याप्रकरणी सौ. अंबिका सराटे, रा. सोलापूर सोलापुर हिस सोलापूर येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. रेडकर साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.यात हकिकत अशी की, फिर्यादी हा आरोपी महिलेस कापड विक्रीच्या व्यवसायाकरिता दि. ११/०७/२०२० रोजी उधारी वर माल दिला होता. सदरच्या मालाची रक्कम परतफेड करण्याकरिता आरोपीने त्यांच्या कडील धनादेश फिर्यादीस दिला होता व फिर्यादीने सदर धनादेश वटण्याकरिता बँकेत टाकला असता तो धनादेश न वटता परत आल्यामुळे फिर्यादी ने आरोपीस वकिलामार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी केली होती परंतु यातील आरोपीने सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे यातील फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध पराक्रम्य संलेख अधिनियम, १८८१ चे कलम १३८ प्रमाणे मा. न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात फिर्यादी साक्षीदार तपासण्यात आले व त्यांची आरोपीच्या वतीने ॲड. दिलीप जगताप यांनी घेतलेली उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.

  यात आरोपी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की " आरोपी हा फिर्यादी यांचे कोणतेही कायदेशीर देणे लागत नसून आरोपीच्या धनादेशाचा यातील फिर्यादी यांनी गैरवापर केला आहे". तसेच यातील फिर्यादी यांना खटला शाबित करता न आल्यामुळे व त्याकामी आरोपीच्या वकिलामार्फत मा. उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल करण्यात आले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे न्यायालयाने आरोपी महिलेची निर्दोष मुक्तता केली. 

यात आरोपीतर्फे ॲड दिलीप जगताप व ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.