Type Here to Get Search Results !

सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेचे राज्यव्यापी निवेदन आंदोलन दि ५/६/२०२५ रोजी स ११ ते दु ०३ आझाद मैदान मुंबई येथे होणार .




सोलापूर (प्रतिनिधी ) या राज्यव्यापी निवेदन आंदोलनाचे नेतृत्व - श्री संपतराव जाधव अध्यक्ष शिखर संस्था व सर्व जिल्हा अध्यक्ष व शिखर सभासद करणार आहेत. 


सोलापूर येथून 60/70 लोक जाणार आहेत, सर्व जेष्ठ नागरिक आहेत. ( सेवानिवृत्त पोलीस ) रेल्वे, बस, खाजगी वाहन

 चलो मुंबई..! चलो मुंबई..! चलो मुंबई..! 

प्रमुख मागण्या :

१) मा. उच्च न्यायालयाचे निर्णयाप्रमाणे एस १४ चि वेतन श्रेणीचा लाभ राज्यातील याचिका कर्ते व सर्व सेवानिवृत्त पोलिस अमलदारांना देण्यात यावा

२) विकलेल्या पेन्शन विक्रीच्या रकमेच्या परतफेडिचा कालावधी मा विविध न्यायालयाचे न्याय निर्णयाप्रमाणे ११ वर्षे ६ महिने करणेत यावा

३) पेंशन विक्रचे शासकीय धोरण, गुजरात सह ईतर राज्याच्या शासन धोरना प्रमाणे राबवण्यात यावे

४) मा. उच्च न्यायालयाचे आदेशा अन्वये सेवानिवृत्तीच्या दिनांका पासून एक जुलै ची वेतन वाढ द्यानेत यावी.

५) उपभोगलेल्या अर्जित रजेचा फरक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा

६) सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा कार्यरत पोलिसांचे प्रमाणे किंवा रेल्वे व BSNL अथवा महानगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यां प्रमाणे देण्यात यावी

७) पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सर्व पोलिस दलाला त्वरीत देण्यात यावा.

८) पोलिसांचे कामाचे तासाचा कालावधी आठ तास करण्यात यावा

९) शासन निर्णय नसताना शिस्तीच्या नावाखाली दररोज सेवानिवृत्त पोलिसांनाकडुन करुन घेतलेल्या चार तास जादा कामाचा मोबदला देण्यात यावा.

१०) शासन निर्णय निर्गमित नसताना, जादा तास नोकरी देउन पोलिस अमंलदारांचे होनारे आर्थिक, व शाररिक शोषन बंद करावे.

११) मा. पोलीस महासंचालक सो यांनी दहा विस तिस चे लाभासाठी शासनाला पाठवलेल्या प्रस्तावावर त्वरीत निर्णय घेणेत यावा. 

१२) डी जी लोन योजनेसाठी त्वरित अर्थसहाय्य देऊन सदरची योजना त्वरीत सुरु करावी.

१३) राष्ट्रपती पोलीस पदक धारकांना घर टेक्स, टोल माफी, बसभाडे सवलतीसह इतर भरघोस सवलती देण्यात याव्यात

१४) कार्यरत व सेवानिवृत्त पोलिसांना साक्ष कामी राज्यभर फिरावे लागते विशेष बाब म्हणून पोलिसांना टोल माफीसाठी शासन आदेश पारीत करण्यात यावा. 

चलो आझाद मैदान..! चलो आझाद मैदान..! चलो आझाद मैदान..!

" ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांच्या न्याय हक्कासाठी "

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.