Type Here to Get Search Results !

गोदूताई नवीन विडी घरकुल मधील घरगुती रासायनिक शिंदी विक्री ला आशीर्वाद कोणाचा ? राज्य उत्पादन शुल्क च्या कारवाई कडे लक्ष.निरीक्षक करतात तरी काय? संतप्त सवाल




सोलापूर (प्रतिनिधी ) शहर लगत असलेल्या व  कुंभारी  भागात मोडत असलेल्या गोदुताई विडी घरकुल (नवीन विडी घरकुल ) भागातील अ विभाग ब विभाग क विभाग येथे  सर्वसामान्य विडी कामगार आपली उपजीविका विडी तयार करून करत आहेत अतिशय सामान्य व गरीब कुटुंब या भागात आपली गुजरान  करत असून आपले पोट भरत आहेत त्यांचे उत्पन्न देखील अतिशय अल्प असून हाताला मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवत आहेत या भागात अनेक जाती धर्माचे लोक राहत असून सण उत्सव जयंती साजरी करतात तसेच आंनदाने एकमेकांच्या सणात सहभागी होतात


स्वस्तात मिळणाऱ्या घरगुती रासायनिक शिंदी ने अनेकांचा बळी जाण्याची शक्यता दाटअसून

 या भागात अनेक ठिकाणी रासायनिक (घरगुती ) शिंदी अल्प दरात मिळत असून  स्वस्त दरात रासायनिक शिंदी मिळत असल्याने कमी पैशात जास्त नशा होत असून गोरगरीब ही रासायनिक शिंदी पिण्यासाठी जातात या रासायनिक शिंदीमुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले  आहेत परंतु कागदोपत्री तशी नोंद केली जात नाही  या रासायनिक शिंदीमुळे अनेकांचा संसार धुळीस मिळाला आहे


गेली अनेक वर्षांपासून नवीन विडी घरकुल भागात रासायनिक शिंदी विक्री होत असून या बेकायदेशीर रासायनिक शिंदी विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग वतीने  कोणतीही कारवाई जात नसल्याचा आरोप या भागातील  सुजाण नागरिक करत असून  नवीन विडी घरकुल मधील रासायनिक घरगुती शिंदी अजून किती लोकांचा बळी घेणार?असा संतप्त सवाल देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाला विचारला जात असून राज्य उत्पादन शुल्क चे निरीक्षक नेमकं करतात तरी काय? असा जळजळीत सवाल देखील या भागातून उपस्थित केला जात असून गोदूताई नवीन विडी घरकुल मधील रासायनिक घरगुती शिंदी विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क च्या धडाकेबाज अधीक्षक काय उपाय योजना करतात? या कडे संपूर्ण नवीन विडी घरकुल वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.