मोहोळ (अमर पवार ) श्री श्रीनिधी रेशीम फार्मर प्रॉडक्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड याविषयी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन भेटी घेऊन शेतकऱ्यांचा रेशीम कोष खरेदी करणे, रेशीम कोशापासून धागा काढणे व रेशीम शेती उद्योगा विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
ही माहिती सोलापूर जिल्हा रेशीम कार्यालय हिरज येथील जिल्हा रेशीम अधिकारी श्री विनीत पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितली. व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी नक्कीच मदत करू असे आश्वासन दिले. या रेशीम उद्योग कार्यशाळा मध्ये बंडी शेगाव , महिम, बाभुळगाव येथील शेतकरी उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाला श्रीनिधी रेशीम शेतकरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे डायरेक्टर श्री सौदागर पांडव, श्री माळी व श्री गवंडे साहेब साप्ताहिक कार्यसम्राट चे मोहोळ तालुका प्रतिनिधी अमर पवार हेही उपस्थितीत होते. हा कार्यक्रम सोलापूर जिल्हा रेशीम कार्यालय चे अधिकारी श्री विनीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली भंडी शेगाव . तालुका पंढरपूर येथे संपन्न झाला.
यावेळी येत्या जुलै महिन्यात सोलापूर येथे कोष बाजारपेठ सुरु होणार असल्याची माहिती श्री विनीत पवार यांनी शेतकऱ्यांना दिली आहे
