Type Here to Get Search Results !

यहाँ के हम हें राजकुमार स्टाईल ने ५ महिन्यांत ३० तडीपार, २५ वेटिंगवर धडाकेबाज युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा गुन्हेगारांना जोर का झटका.



सोलापूर (प्रतिनिधी ) शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. १ जानेवारी ते १६ जून या साडेपाच महिन्यांत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी २९ जणांना तडीपार केले आहे. याशिवाय आणखी २५ सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत. त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटळ आहे.


पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दीड वर्षात १०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या

पार्श्वभूमीवर शहरातील विजापूर नाका, सदर बझार, सलगर वस्ती, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, एमआयडीसी व जेलरोड या सात पोलिस ठाण्यांनी त्यांच्याकडील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यात विशेषतः शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे. असे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस ठाण्याकडून पोलिस आयुक्तालयाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त त्यासंदर्भात चौकशी करतात आणि त्याचा अहवाल पोलिस उपायुक्तांकडे पाठविला जातो. त्यानुसार पोलिस उपायुक्त त्या सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करतात, अशी ही प्रक्रिया आहे. आगामी काळात शहरातील तडीपारांच्या यादीत आणखी नावे समाविष्ट होऊ शकतात, तत्पूर्वी त्या सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात पोलिसांना बदल अपेक्षित आहे.


दरम्यान, भैरू वस्तीतील दोन नंबर झोपडपट्टी येथे राहणारा आशुतोष ऊर्फ धीरज अशोक जाधव याला पोलिसांनी तडीपार केले होते. पण त्याने आदेश मोडल्याने पोलिस आयुक्तांनी त्याला स्थानबद्ध केले आहे. त्याची रवानगी आता पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. एकंदरीत यहाँ के हम हें राजकुमार स्टाईल ने धडाकेबाज युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हेगारांना जोर का झटका चांगलाच दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.