Type Here to Get Search Results !

जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणं पथकाने 5 मोटारसायकली सह 2 आरोपीना ठोकल्या बेडया 1 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त.




सोलापूर (प्रतिनिधी ) जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरी प्रकरणी दोन आरोपींच्या मुसक्या आवळून एकूण ५ मोटार सायकल जप्त केल्या असून ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिताफीने पार पाडण्यात आली.

चोरीच्या तपासासाठी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

पोलीस आयुक्त . एम. राजकुमार व पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण यांनी जोडभावी पेठ परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढल्यामुळे कठोर तपासाचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. २४ मे २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस कर्मचारी १५६५ दादासाहेब सरवदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक मोठा सर्जिकल डाव रचण्यात आला.

 आरोपी क्र. १ – ज्योतीबा केरचा मानकर

 वय – २९ वर्षे

 व्यवसाय – आचारीराहिवास – यशवंत नगर, एमआयडीसी, सोलापूर कारवाई – तळेहिप्परगाजवळील कचरा डेपोजवळ एका जुन्या पत्रा शेडमध्ये चोरीच्या चार मोटार सायकली विक्रीसाठी आणलेल्या अवस्थेत मिळून आला. पंचासमक्ष ४ मोटार सायकली जप्त.

 आरोपी क्र. २ – अय्यप्पा माळप्पा पारट

वय – ३८ वर्षे

राहिवास – घोंगडेवस्ती, भवानी पेठ, सोलापूर कारवाई – हिंदू लिंगायत स्मशानभूमीजवळ (तुळजापूर बेस) काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्याला पकडले. १ मोटार सायकल जप्त.

जप्त केलेल्या ५ मोटार सायकलचा तपशील व संबंधित गुन्हे

अ.क्र. पोलीस ठाणे गु.र.नं. व कायदा वाहनाचे वर्णन व किंमत

१ जोडभावी पेठ ५५१/२०२४, BNS 303(2) ग्रे-काळ्या रंगाची Honda Dream Yuga (₹३०,०००)

२ जोडभावी पेठ ३३३/२०२५, BNS 303(2) काळ्या मॅट रंगाची Suzuki Access, MH-13-DL-5920 (₹३५,०००)

३ जोडभावी पेठ ३७३/२०२५, BNS 303(2) ग्रे रंगाची Suzuki Access 125, MH-13-BH-2082 (₹३५,०००)

४ मोहोळ ४३/२०२५, BNS 316(2), 318 काळी-ग्रे Hero Splendor Plus, MH-45-AW-8337 (₹६०,०००)

५ जोडभावी पेठ ३७६/२०२५, BNS 303(2) काळी Hero Honda Splendor, MH-13-AR-2743 (₹१५,०००)

 एकूण किंमत : ₹१,७५,०००/

कारवाईतील अधिकारी व पोलीसांचे योगदान

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोनि/गुन्हे शबनम शेख यांच्या नेतृत्वाखाली खालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली:

सपोनि/पडसळकर

सपोनि/महाडिक

पोहेकॉ/१६८५ खाजप्पा परसप्पा आरेनवरु

पोहेकॉ/१३७० शितल अशोक शिवशरण

पोहेकॉ/९९३ विठ्ठल पांडुरंग पैकेकरी

पोकॉ/१५६५ दादासाहेब सरवदे

पोकॉ/१३२१ बसवराज पंचाक्षरी स्वामी

पोकॉ/९८ अभिजीत बाळासाहेब पवार

पोकॉ/६१३ स्वप्निल उत्तम कसगावडे

पोकॉ/१७३६ दत्ता रामदास मोरे

पोकॉ/१९१७ यशसिंह नरेश नागटिळक

पोकॉ/१५०४ दत्ता दगडु काटे

पोकॉ/१५५५ विठ्ठल चिदानंद काळजे

मोटार सायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आणि वेगवान हालचालीने केलेली ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद आहे. या कार्यामुळे नागरिकांच्या मनात पोलीस दलाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.