सोलापूर (प्रतिनिधी ) राज्यातील मुंबई, ठाणे यासह इतर शहरात कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यासाठी कोरोना चाचणीसाठी आरटीपीआरच्या ५०० किटस्ची मागणी करण्यात आली आहे. डॉ. व्ही. एम. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ही मागणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) केली आहे.
डॉ. व्ही. एम. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात विभाग प्रमुखांसोबत आतापर्यंत दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात
सध्या कोरोनबाधित नाहीत, शासकीय पातळीवर कोरोनाची चाचणीही केली जात नाही. शासनाकडूनही कोणतेच निर्देश नाहीत. राज्यातील इतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता, खबरदारीची उपाययोजना म्हणून महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन तयारीला लागले आहे.
महाविद्यालयात असलेल्या खाटांची संख्या, व्हेंटिलेटर व कोरोना महामारीत काम केलेल्या यंत्रणांचा आढावा डॉ. संजीव ठाकूर
यांनी घेतला आहे. आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ यांची काय स्थिती आहे?, आयत्यावेळी धावपळ नको म्हणून या सर्व यंत्रणाचा आढावा त्यांनी घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या ला मोठे नूकसान झाले आहे. प्रशासक पातळीवरही मोठी तारांबळ उडाली होती कोरोना महामारीतील वाईट आठवण आजही रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक प्रशासकीय यंत्रणेला आहेत.
