Type Here to Get Search Results !

कल्याणला जाण्यासाठी रेल्वेत बसलेली ६३ वर्षीय महिला प्रवासात बेपत्ता; लोहमार्ग पोलिसांचे आवाहन




सोलापूर : उद्यान एक्सप्रेस गाडीने कल्याण येथे जाण्यासाठी रेल्वेत बसलेली श्रीमती बिबन अहमद पठाण ही ६३ वर्षीय महिला घरी पोहोचली नाही. ती हरविल्यासंबंधीची तक्रार मुलगा चांद शहारूख अहमद पठाण यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली.


ठाणे जिल्ह्यातील कल्याण ईस्ट कचोरे रोड, पत्रीपूल राधाकृष्ण मंदीराजवळील हनुमान नगरातील रहिवासी श्रीमती बिबन अहमद पठाण नातेवाईकांना भेटत मुलगी नमाजबी शरीफ मुजावर (रा. मडकी बस्ती, पुणे रोड, सोलापूर यांच्या घरातून कल्याणकडे जाण्यासाठी 02 मे रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानकातून उद्यान एक्सप्रेसमध्ये बसली, मात्र ती तिच्या घरी पोहोचली नाही.


मुलगा चांद शहारुख याने सर्व नातेवाईक आणि आप्तेष्ठांकडं शोध घेतला असता, ती मिळून न आल्याने ती हरविल्याची तक्रार, 09 मे रोजी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. हरविलेल्या महिलेचे नांव व वर्णन-श्रीमती बिबन अहमद पठाण, वय ६३ वर्षे अंगाने जाड, रंगाने गोरी, उंची ५ फुट ५ इंच, केस काळे-पांढरे वाढलेले, नाक सरळ मोठे व चेहरा गोल आहे. तसेच त्यांचे अंगावर साडी-ब्लाऊज घातलेला आहे.


ही महिला छायाचित्र व वर्णनाप्रमाणे आढळून आली वा तिच्यासंबंधी काही माहिती असल्यास सोलापूर लो. पो. ठाणे येथे फोन नं.

02172318767 वा तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक भाजीभाकरे (भ्रमणध्वनी : 09011825825) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.