Type Here to Get Search Results !

गड्या जाशील बाराच्या भावात, रोड रोमिओनें घेतला डॅशिंग पोलीस आयुक्तांचा धसका.




सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या काही महिन्यांपासून शाळा, कॉलेज, गर्दीच्या ठिकाणी रोडरोमिओ मंडळींकडून महिला, मुली, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढताहेत. शिवाय काहीजण याचा गैरप्रकारही करताहेत. त्यावरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. या प्रकारावर आता खाकी वर्दीतील दामिनी पथकाने चांगलेच मनावर घेतलेले दिसतेय. अशा रोड रोमिओचा दामिनी पथकाकडून चांगलाच समाचार घेण  सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत जवळपास रोडरोमिओंच्या तक्रारीचा एक कॉल १४०० हून अधिक जणांना खाकीनं त्यांच्यावर एक्शन घेतली. यात अगदी १८ वयोगटापासून २५ पर्यंतची मंडळी दिसून आली. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी उपदेशाचे डोस पाजवून वेळीच सुधारणा नाही झाली तर कठोर कारवाईचा इशारा  देखील दामिनी पथकाकडून देण्यात आला.


आजूबाजूच्या लोकांसमोर त्यांची अशी शोभा झाली. उपस्थितांपैकी काही जणांनी हे चित्र पाहून

आपसात 'नीट वाग गड्या, नाहीतर जाशील बाराच्या भावात' अशी कुजबुज सुरु असून सुधरा रे अशा विनोदी कोपरखळ्या मारल्या.जात आहेत. एकंदरीत सोलापूर शहरातील रोड रोमिओनी कडक शिस्तीचे डॅशिंग पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.