Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर संघटक पदी साप्ताहिक मित्र प्रेम चे रिजवान शेख यांची नियुक्ती.




सोलापूर(प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची  स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी  अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाची अट आठवी पास करणे  पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध  विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

 *पत्रकार रिजवान शेख यांचा अल्प परिचय*

 पत्रकार रिजवान शेख हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून  साप्ताहिक मित्र प्रेम चे कार्यकारी संपादक असून पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी देखील जपत आहेत त्यांचे शिक्षण बी कॉम डिप्लोमा इन जर्नलिझम पर्यंत झाले असून ते छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम बिग्रेड त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष चे सोलापूर शहर उपाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडत आहेत.सर्वसामान्य माणसांच्या अडचणीत 

पत्रकार रिजवान शेख नेहमीच धावून जातात

त्यांच्या धडाकेबाज  व त्यांनी आत्तापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून त्यांच्या या शांत संयमी पत्रकारिता ची पत्रकार सुरक्षा समिती ने दखल घेऊन पत्रकार रिजवान शेख यांची पत्रकार सुरक्षा समित सोलापूर शहर संघटक पदी नियुक्ती केली  पत्रकार रिजवान शेख यांची शहर संघटक पदी नियुक्ती झाल्याने शहरातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून एका सच्चा व प्रामाणिक पत्रकाराला शहर संघटक पदी काम करण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केलं जात असून पत्रकार रिजवान शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नूतन शहर संघटक रिजवान शेख यांना

 पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश संघटक गणेश जाधव प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिरझा गालिब मुजावर पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड  सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ रायगड नवी मुंबई अध्यक्ष राज भंडारी अहिल्यानगर अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी  सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.