सोलापूर (प्रतिनिधी)
श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची सन 2025/26 साठी उत्सव पदाधिकारी निवड बैठक कुंभार वेस येथील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या बैठकीस सुरुवात झाली बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे, लिंगायत समाजाचे नेते गणेश चिंचोळी,अनिल परमशेट्टी, आदि उपस्थित होते…
श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष यांनी सन 2025/26 साठी उत्सव अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष केंगारकर यांची एकमताने निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केलं यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन उत्सव अध्यक्ष मनिष काळजे म्हणाले की सर्वांना बरोबर घेऊन पारंपारिक पद्धतीने व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत जयंती उत्सव साजरा करण्यात येईल जास्तीत जास्त मंडळांनी मिरवणुका पारंपरिक पद्धतीने काढून मध्यवर्ती महामंडळात सहकार्य करावे अस आवाहन केलं..
श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सन 2025 /26 चे पदाधिकारी पुढील प्रमाणे उत्सव अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, कार्याध्यक्ष संतोष केंगनाळकर, उपाध्यक्ष वैभव विभुते, मिरवणूक प्रमुख गौरव जक्कापुरे, आदींची निवड करण्यात आली यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
