Type Here to Get Search Results !

जोशी गल्लीत एकाची हत्या एका खून का बदला खून; आरोपी आठ तासात जेरबंद जोडभावी पेठ पोलिसांची दमदार कारवाई

 



सोलापूर (प्रतिनिधी )

शहरातील रविवार पेठ भागातील जोशी गल्लीत खून का बदला खून घडला आहे. सहा वर्षांपूर्वी झालेल्या भावाच्या खुनाचा बदला म्हणून खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.

तुकाराम ऊर्फ रॉबर्ट पांडुरंग सरवदे (रा. जोशी गल्ली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत विष्णू पांडुरंग सरवदे (वय

३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम प्रकाश सरवदे (रा. जोशी गल्ली) याच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम सरवदे यांना दारूचे व्यसन होते. २०१९ मध्ये त्याने उत्तम सरवदे याचा भाऊ सागर प्रकाश सरवदे याचा खून केला होता. त्याचा राग मनात धरून सागरच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने १० मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास जोशी गल्लीतील उध्दव महाराज सरवदे यांच्या घरासमोर

उत्तम सरवदे याने तुकाराम सरवदे यास हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे तुकाराम सरवदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तुकाराम यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी उत्तम सरवदे यास अटक केली आहे.

 सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान बशीर शेख पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कसगा वडे पोलीस कॉन्स्टेबल यश नागटिळक पोलीस कॉन्स्टेबल मल्लिनाथ स्वामी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोष्टी यांनी पार पाडली 

 अधिक तपास पोलीस निरीक्षक शबनम शेख करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.