साप्ताहिक कार्यसम्राट चे तानाजी माने यांचा सत्कार



सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ समजून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र गेल्या दहावर्षांपासून सोलापूर जिल्हा सह राज्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक बातम्याचा वेगवान आढावा घेऊन अविरत पणे सामाजिक बांधिलकी म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट ने आजवर आपली भूमिका बजावली असून समाजातील तळागांळाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढीत घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या मंगळवेढा तालुका प्रतिनिधी पदी युवा पत्रकार तानाजी माने यांची नुकतीच निवड करण्यात आली असून सोलापूर येथे साप्ताहिक कार्यसम्राट चे जेष्ठ पत्रकार तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख यांच्या हस्ते तानाजी माने यांचा पुष्पगुछ शाल नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संपादक यशवंत पवार महेश मेटकरी राजकुमार शिंदे व अन्य उपस्थित होते मंगळवेढा येथील पत्रकार तानाजी माने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



Post a Comment

0 Comments