सोलापूर (प्रतिनिधी) दिनांक २६/०२/२०२५ रोजी पो.उप.नि. मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हदित गस्त करीत असताना, जोडबसणा चौकाचे पुढे जमखंडी पुल, येथील सार्वजनिक रस्त्यावर एक ASHOK LEYLAND कंपनीचे टेम्पोमध्ये, काहीतरी संशयास्पद वस्तु घेऊन जात असताना, आरोपी नाव१) शुभम लक्ष्मण पाटील वय २६ वर्षे, व्यवसाय (सिक्युरीटी इंचार्ज), राहणार यशवंत नगर घर नं. ५४ बाळे सोलापूर, २) अरिफ नुरुद्दीन सय्यद वय ३० वर्षे, व्यवसाय (गैस विल्डींग काम), राहणार राहुल गांधी झोपडपट्टी पाच्छा पेट सोलापूर, ३) इरफान बाबु मुच्छाले वय ३२ वर्षे, व्यवसाय (टेम्पो ड्रायव्हर), राहणार ५८५ बी जुना विडी घरकुल कुंभारी ता. द. सोलापूर यांना घेतले. नमूद इसमांकडे चौकशी केली असता, त्यांनी एम.एस.सी. बँकेने सिल केलेल्या शारदा सुत मिल, कुंभारी येथुन सुत मिलमधील मोठ्या मशनरी, गैस कटरच्या सहायाने कट करुन, ते टेम्पोमध्ये भरुन विक्री करीता सोलापूर मध्ये आणलेचे सांगितले. त्याप्रमाणे, त्यांच्याकडुन सदर टेम्पो व टेम्पोमधील ०४,६०,१२५/- रुपयांचा मुद्देमाल भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम ३५ (इ) प्रमाणे ताब्यात घेतला. वरील नमूद मुद्देमाल बाबत अधिक माहिती घेतली असता, त्याबाबत, वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गु.र.नं.८०/२०२५ मा. न्या. सं. कलम ३०५ (क), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये, गुन्हा दाखल असून, सदर कारवाईमुळे सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे.
