जेष्ठ नागरिक महिला व पुरुष यांची चालण्याची स्पर्धा




    सोलापूर (प्रतिनिधी ) सालाबाद प्रमाणे नवीन वर्षात  01/01/2025 रोजी सकाळी सहा वाजता द्वारकाधीश मंदिर, जुळे सोलापूर येथे जेष्ठ नागरिकांची चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याचे नियोजन करण्यासाठी  विरंगुळा, प्रेरणा,  समर्थ, नंदनवन, साक्षेप, विवेक, बांथनाल -  श्री द्वारकाधीश,  जेष्ठ नागरिक संघ, जुळे सोलापूर  अध्यक्ष व सचिव आणि समनव्यक यांनी  आयोजित केली होती. 

श्री द्वारकाधीश मंदिर समोर जुळे सोलापूर येथे ही स्पर्धा पार पडली 

 सकाळी 06.00 वा. ते 08.15 वा दरम्यान

 पुरुष वय 60/70 वर्षे  द्वारकाधीश मंदिर ते सहयोग सोसायटी व परत   2 की मी. 

2) पुरुष 70 + द्वारकाधीश मंदिर ते शिवदारे कॉलेज व परत  1.00 की. मी  

3) महिला 60/70 वर्षे  - श्री द्वारकाधीश मंदिर ते विजापूर रोड  व परत 1.5 किमी 

4) महिला 70+ वर्षे  द्वारकाधीश मंदिर ते हरेकृष्ण विहार सोसायटी 1 किमी. 

या स्पर्धा  कार्यक्रम चे अध्यक्ष आमदार सुभाष (बापु )देशमुख होते यांचे   ही स्पर्धा जयश भाई पटेल, संजय भाई शाह उदयोगपती  चेतन चौधरी, व चंदू काका सराफ,यांच्या सौजन्याने आयोजित केली होती, या स्पर्धामध्ये 600 पुरुष व 50 महिलानी भाग घेतला. उत्कृष्ट पणे सर्वांनीच स्पर्धा झाली जुळे सोलापूर हे जेष्ठमय झाले होते. 




पुरुष 60/70 1)  अजित डोके   2)सुनील काशीद         3) सुदाम वैजिनाथ घाळे 

पुरुष 70+ 1)  मधुकर आलू जाधव  2)  श्रीमंत नागप्पा कलबुर्गी  3) सुहास माने 

महिला मध्ये  60/70 1)   शामल प्रकाश रसाळ      2) सुवर्णा मार्तंड   3) सुलभा घोडके 

महिला   70+  1) विमल जयप्रकास चौधरी 2) जयश्री जहागीरदार       

सोलापुरातील जास्तीजास्त जेष्ठ नागरिकांना व्यायामाची आवड निर्माण होऊन त्यांचे आरोग्य निरोगी व्हावे म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments