Type Here to Get Search Results !

जबरदस्तीने कारमध्ये बसवून काढून घेतले मोबाईल, घड्याळ गेंट्याल चौक परिसरातील प्रकार दोघांना कोठडी.



सोलापूर(प्रतिनिधी) अक्कलकोट रोड एमआयडीसीच्या हद्दीतील सिद्राम धोंडप्पा बरगुडे हे १ जानेवारीला रात्रीच्या सुमारास घराकडे जात होते. त्यावेळी गेंट्याल चौकात मागून आलेल्या कारचालकाने जबरदस्तीने गाडीत बसविले. त्यानंतर आतील दोघांनी मोबाईल, घड्याळ, अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. सिद्राम बरगुडे यांच्या फिर्यादीवरून ओमशी कोकंती, प्रताप साखरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


फिर्यादी सिद्राम बनगुडे यांना कारमध्ये बसवून माळी नगर येथून कुंभारीला नेले. दारूच्या नशेत तेथील बिअरबारजवळ नेऊन मारहाण केली. मोबाईलचा पासवर्ड घेऊन फोन पेवरून पैसे काढून घेतले. त्यांनी पोलिसांत धाव

घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पडताळून पाहिले. त्यात चारचाकीचा नंबर दिसून आला. फोन पेवरून कोणत्या नंबरवर पैसे पाठविले याचाही शोध घेतला. त्यावरुन पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिवे यांच्या पथकाने केली. शुक्रवारी (ता. ३) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली असून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, त्या दोन्ही संशयितांवर यापूर्वीचे कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचेही सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.