Type Here to Get Search Results !

श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर,होम मैदान व नंदीध्वज मिरवणूक मार्गाची आज सोलापूर महानगरपालिका व पोलीस आयुक्त कार्यालय वतीने पहाणी दौरा



सोलापूर (प्रतिनिधी ) सालाबादा प्रमाणे श्री सिद्धरमेश्वर यात्रेच्या नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आले होते त्याची सुरवात आज नंदिध्वजाचे प्रमुख मानकर श्री राजशेखर हिरेहब्बू यांच वाड्या पासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिऱेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एस. राजकुमार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा करण्यात आला.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजित केले जाते या दरम्यान 12 जानेवारी पासून यात्रेला 68 लिंगास तैला अभिषेक केला जाता शिवाय ताच दिवशी मानाच्या सात नंदीध्वजाची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरूवात केली जाते.सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी यावेळी दिली तसेच महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे,मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे हाती घेण्यात आले असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्री काळात मोलाचे सहकार्य लाभते असे सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे ,सहा. पोलीस आयुक्त श्री शिरडकर,सहा.आयुक्त शशिकांत भोसले, सर्वजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, हिदायत मुजावर,विद्युत विभागचे राजेश परदेशी, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, सफाई अधिकारी अनिल चराटे,बिपीन धूम्मा, जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.