जनदर्पण न्यूज चॅनल ने सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवले- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार.




सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून समाजातील घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटना निरपेक्ष निर्भीड व परखड पणे जनदर्पण न्यूज ने जनतेसमोर मांडून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त व अडचणीत असलेल्या  रंजलेल्या गांजलेल्या शोषित समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात पोटतिडकीने मांडून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार व मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या विकासासाठी अल्पअवधीत घराघरात पोहोचलेले जनदर्पण न्यूज ने केली असून  जनतेच्या व्यथा वेदना व अडचणी ची अचूक माहिती घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा  प्रामाणिक पणे प्रयत्न जनदर्पण न्यूज ने केला आहे  जनदर्पण न्यूज चॅनल चा 6 वा वर्धापन दिन कार्यक्रमात पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार बोलत होते  जनदर्पण न्यूज चॅनल चे संपादक दिंगबर ईप्पलपल्ली यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप आशिष भूदत्त भास्कर अल्ली प्रमोद तूपसमुद्रे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments