जड वाहतूकीने घेतला साक्षी कलबुर्गी चा बळी वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरीची सर्वत्र चर्चा वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह




सोलापूर (प्रतिनिधी ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात तसेच युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांची कन्या कन्या  शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास विक्रम कलबुर्गी यांची पत्नी रेणुका  व मुलगा अभिषेक व मुलगी साक्षी यांना शिकवणी ला सोडण्यासाठी जाताना तालुका पोलीस स्टेशन समोर एक डांपर  MH 13 EF 9388 ही गाडी भरदाव वेगाने येऊन यांच्या स्कूटी ला धडकले व गंभीर अपघात झाला. त्यात साक्षी गंभीर जखमी झाली. तात्काळ महिला रुग्णालय दाखल केले तदनंतर अश्विनी रुग्णालय येथे नेण्यात आले. उपचारा पूर्वी साक्षी चे निधन झाल्याचे डॉक्टरांनी मयत घोषित केले. सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले चिमकुली चा जड वाहतुकीची ने बळी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात असून जडवाहतूक करणारी वाहने शहरात येतात कशी ?असा प्रश्न  कलबुर्गी कुटूंबानी विचारला असून वाहतूक शाखेच्या चिरीमिरी ची चर्चा आता शहरात होऊ लागल्याने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Post a Comment

0 Comments