सी.एन.जी.(C.N.G.) भरण्यापूर्वी प्रवाशांना गाडीतून का उतरवले जाते ?



सी.एन.जी. कार मध्ये गॅस भरताना प्रवाशांना खाली उतरवल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

 तर पेट्रोल किंवा डिझेलच्या गाड्या जेव्हा पेट्रोल पंपावर नेल्या जातात,

 तेव्हा प्रवासी आरामात बसलेले दिसतात.


 पेट्रोल, डिझेल आणि सी.एन.जी. इंधन भरण्यात इतका फरक का?

 सी.एन.जी. कार मध्ये कोणत्या प्रकारचे धोके आहेत


           ते जाणून घेऊया


खरे तर सी.एन.जी. गाड्यांबाबत योग्य वेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा स्फोट होण्याचा धोका असतो.

 अनेकदा पेट्रोल पंपावर सी.एन.जी. भरण्यापूर्वी प्रवाशांना उतरवण्याचा इशारा लिहिलेला असतो, यामागे सुरक्षेचा प्रश्न असतो.

          सी.एन.जी. 

        (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) 

गॅस उच्च दाबाखाली साठवला जातो.

 जर गळती झाली, तर त्याचा स्फोट होऊ शकतो. 

अशा स्थितीत गाडीतून प्रवाशाला बाहेर काढले आणि जर गळती झाली,

 तर इजा होण्याचा धोका कमी होतो. सी.एन.जी. ज्वलनशील आहे. गळती होऊन आग लागल्यास वाहनाच्या आत लोक अडकण्याचा धोका असतो.

 याशिवाय, प्रवाशाला कार मधून बाहेर काढल्याने कारचे वजन कमी होते, ज्यामुळे सी.एन.जी. भरण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होते. 

कार मध्ये प्रवासी नसताना सी.एन.जी. नोजल टाकी पर्यंत सहज जाता येते. बहुतेक प्रकरणांमध्ये, लोक बाहेरून सी.एन.जी. फिटिंग करून घेतात, ज्यामुळे रिफिलिंगच्या वेळी नॉब शोधण्यात अडचण येते.

 तसेच, बाजारातील छेडछाडी मुळे धोका वाढतो.


*सी.एन.जी. भरण्यासाठी सुरक्षा नियम*


⭕काही सी.एन.जी. स्टेशनवर गाडी भरताना प्रवासी नसावेत असे नियम आहेत.


⭕काही विमा कंपन्या सी.एन.जी. भरताना कार मध्ये प्रवासी नसतील अशी अट घालू शकतात.


⭕सी.एन.जी. मध्ये स्फोट होण्याचा धोका असतो हे खरे,

 पण योग्य ती खबरदारी घेतल्यास तो कमी करता येतो. सी.एन.जी. स्टेशनवर प्रशिक्षित कर्मचारी असतात आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतात.


        सी.एन.जी. भरताना घ्या ही खबरदारी


⭕अधिकृत सी.एन.जी. स्टेशन वरूनच सी.एन.जी. भरून घ्या.


⭕सी.एन.जी. भरताना धुम्रपान करू नका किंवा मोबाईल फोन वापरू नका.


⭕गॅसचा वास येत असल्यास किंवा गळती दिसल्यास, स्टेशन कर्मचाऱ्यांना ताबडतोब सांगा.


⭕ कारच्या सी.एन.जी.

(C.N.G.) टाकीची नियमितपणे चाचणी करा.


⭕हे नियम केवळ सी.एन.जी. कार साठीच नाही,

 तर सी.एन.जी. बस आणि टेम्पोलाही लागू होतात.

Post a Comment

0 Comments