सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील गतिरोधकांवर महापालिका चे नियंत्रणचं नाही अशास्त्रीय आणि विनापरवाना गतिरोधकांच्या मुद्यावर केवळ झोन कार्यालयाकडे बोट दाखवून महापालिका मुख्य कार्यालय आपली जबाबदारी झटकण्याचां प्रयत्न करत आहे.
या अशास्त्रीय गतिरोधकमुळे दुचाकी स्वारांना कंबरेचा त्रास होत असून अश्या घटना महापालिका गांभीर्याने घेत नाही शहरामध्ये प्रत्येक गल्लीबोळात गरज नसताना गतिरोधक केले जात आहेत त्याला वाहतूक पोलिसांची परवानगी आहे की नाही हे देखील पाहिले जात नाही प्रीमिक्स रस्त्यावर कसे ही टाकून गतिरोधक केले जाते त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारल्या जात नाहीत रिप्लेक्टर बसवले जात नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचा अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून कमरेचा त्रास देखील होतोय गतिरोधकावर पांढऱ्या पट्ट्या नसल्याने अनेक दुचाकी वाहने गतिरोधकावर आधळून वाहनांचे देखील नुकसान होत आहे
गतिरोधकांची प्रमाणापेक्षा उंची जास्त
सोलापूर शहरात अनेक ठिकाणी त्याचबरोबर गल्लीबोळात गतिरोधकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा गतिरोधकांची उंची देखील जास्त असल्याने दुचाकी अशा उंचीवर असलेल्या गतिरोधकांवर आधळून अपघातांची संख्या देखील वाढत आहे त्याचबरोबर दुचाकी स्वारानां कमरेच्या त्रासाला सामोर देखील जावं लागत आहे.
0 Comments