सोलापूर (प्रतिनिधी ) मध्य रेल्वेकडे नव्याने 3 रेक उपलब्ध झाल्याने सोमवार पासून हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी वेळेवर धावणार आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत मध्य रेल्वे कडून एकूण तब्बल 509 गाड्या सोडल्या जात आहेत त्यातच 10 नोव्हेंबर पासून पुणे -अमरावती ही गाडी जळगाव मार्गे नव्याने सुरु केल्याने पुणे -सोलापूर या मार्गावरील हुतात्मा एक्सप्रेससाठी रेक उपलब्ध होण्यास विलंब लागत होता परिणामी 9नोव्हेंबर ते 12नोव्हेंबर सलग तीन दिवस हुतात्मा एक्सप्रेस चे वेळापत्रक कोलमडले परिणामी प्रवाशानां मनस्ताप झाला.
हुतात्मा एक्सप्रेस ही भुसावळ पर्यंत जायची पण 4 महिन्यापासून ती बंद होती आता दिवाळीनिमित्त जळगाव बुलढाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यातील नागरिकांसाठी नवीन गाडी सुरु करण्यात आली. त्यामुळे हुतात्मा गाडीसाठी तीन दिवसापासून रेक उपलब्ध होण्यास विलंब झाला. पुणे स्थानकावर सलग तीन दिवस सुमारे दीड हजार प्रवाशाना तीन तासाहून अधिक वेळ गाडीची वाटपहात ताटकळत थांबावे लागले.
0 Comments