देशाची आरोग्यक्षम पिढी घडविण्यात डॉक्टरांचे मोठे योगदान. - सीईओ स्वामी.


सोलापूर (प्रतिनिधी )

जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीईओ स्वामी बोलत होते. पुढे बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की डॉक्टरांना देवाचा दर्जा आहे. एखाद्याचा जिव वाचविण्याचे भाग्य डॉक्टरांना लाभले आहे. अवघा समाज तुमच्याकडे देवासमान मानतो त्यामुळे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना तुमची जबाबदारी वाढते. याशिवाय देशाची भावी पिढी व विद्यार्थी आरोग्यक्षम घडविण्यामध्ये डॉक्टरांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देताना ग्रामस्थांशी सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. ग्रामस्थांशी सुसंवाद असेल तरच तुमच्याबद्दलचा विश्वास वाढून तुमचे प्रत्येक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. कोरोना काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्यास तोड नाही. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेमध्ये वारकऱ्यांची सेवा तुम्ही उत्तमरीत्या केली आहे. महाआरोग्य शिबीरामध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आपल्या टीमने केली आहे. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी आणि आरोग्य मंत्री महोदयांनी आपल्या टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे. याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन. 

यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बिरुदेव दुधभाते, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. मोहन शेगर, तालुका आरोग्य अधिकारी उत्तर सोलापूर डॉ. सुमित्रा तांबारे, तालुका आरोग्य अधिकारी अक्कलकोट डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी मोहोळ डॉ. अरूण पाथरूटकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments