अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल



सोलापूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण 7 व्या आयोगाप्रमाणे देणेबाबत अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिनांक 18/5/2023 रोजी मुख्यमंत्री  सचिवालय मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले होते  या निवेदनाची मुख्यमंत्री सचिवालय ने दखल घेऊन  आपल्या कार्यालयीन स्तरावर वरून तात्काळ आवश्यक ती कारवाई करणे बाबत सोलापूर चे पोलीस अधीक्षक  व सोलापूरचे पोलीस आयुक्त  यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे तसेच सदरची बाब शासन स्तरावर असल्यास  त्याबाबत वरिष्ठ विभागीय कार्यालय मार्फत अहवाल सादर करण्याचे पत्रात नमूद केले आहे  तसेच उचित नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून अर्जदारांना कळविण्यात यावे असे देखील नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments