Type Here to Get Search Results !

सव्वा दोन वर्षात सोलापूरातून तब्बल 56 गुन्हेगारावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची तडीपारीची रेकॉर्ड ब्रेक कारवाई, गुन्हेगाराचे कंबरडे मोडण्यात आयुक्त यशस्वी : पोलीस महासंचालक यांच्याकडून कौतुक.





सोलापूर (प्रतिनिधी ) पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील व्यक्तीवर 'एमपीडीए' कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी थेट कारागृहात स्थानबद्ध करण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांना आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 

२० फेब्रुवारी २०२४ ते २० मे २०२६ या कालावधीत 

 तब्बल ५६ गुन्हेगारांवर

'एमपीडीए'ची कारवाई करून त्या सर्वाना 

 पुण्यातील येरवडा कारागृहात पाठवले आहे 

 १९९२ पासून (पोलिस आयुक्त कार्यालय स्थापन झाल्या पासून  झाल्यापासून) सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर 'एमपीडीए'ची कारवाई झालेली नव्हती.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुरुवारी (ता. २१) रात्री उशिरा प्रदीप मौला गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, सलगर वस्ती) याच्यावर 'एमपीडीए'ची कारवाई केली. सव्वादोन वर्षांतील त्यांच्या कामगिरीबद्दल अपर पोलिस महासंचालकांनीही कौतुक केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार किंवा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीला सहा महिने ते दोन वर्षांसाठी हद्दपार केले जाते. ठरवून दिलेल्या मुदतीत तो त्या हद्दीत पुन्हा आढळल्यास, वॉरंटशिवाय अटक करून थेट कारागृहात पाठविले जाते. सव्वादोन वर्षांत सोलापूर शहरातील १७० जणांवर (सरासरी पाच दिवसांत एक) जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई झाली आहे. दुसरीकडे, 

सामाजिक आडोशातून काहीजण स्वतःची गुन्हेगारी कृत्ये लववितात . वाळू तस्करी, अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री, ड्रग्जची विक्री-वाहतूक, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी हाणामारी, चोरी-घरफोडी, दरोड्याचे गंभीर गुन्हे करणाऱ्यांची समाजात दहशत असते.

काहीवेळा सोशल मीडियातून अफवा पसरवून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचाही प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. अशांवर 'एमपीडीए'ची कारवाई केली जाते.  पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सव्वा दोन वर्षात तब्बल 56 गुन्हेगारावर तडीपारी सारखी कारवाई केल्याने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून या कारवाई चे पोलीस महासंचालक यांच्याकडून कौतुक देखील केलं जात आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.