सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटार सायकलवरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायला जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वर येणे -जाणे परवडत नाही त्याच बरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोल चा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्ताकंन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकरीचे झाले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना वारंवार यावे लागते अनेकदा ऊन वारा व पाऊसामुळे पत्रकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो त्याच बरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटारसायकल वरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळवा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 6/3/2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते या बाबत राज्य सरकार ने अद्याप निर्णय केला नाही या संदर्भात पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक 5/3/2026 रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त यांना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळणे काम निवेदन देण्यात आले. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्याची विनंती देखील करण्यात आली
*एसटी बस मधून ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत प्रवास मिळणेसाठी परिवहन मंत्र्यांची भेट घेणार -यशवंत पवार*
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी वारंवार ये जा करावी लागत आहे जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक मोठी कार्यालय असल्याने पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार यावं लागत असल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळणे कमी सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त पुणे यांना वेळोवेळी निवेदन व पत्रव्यवहार केलेला आहे याबाबत आपण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांची देखील भेट घेऊन ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास देण्याची मागणी करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

