Type Here to Get Search Results !

फिट इंडिया मुव्हमेंट,आरोग्य जपण्याचा मुलमंत्र देत सायकल रॅली

 



सोलापूर(प्रतिनिधी ) फिट इंडिया मुव्हमेंट' अंतर्गत सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रविवारी (ता. ७) सायकल रॅली काढण्यात आली. यात पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, कुशल जैन, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, सुरेंद्र मळाळे, मच्छिंद्र पंडीत, दिलीप पवार, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व अन्य अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. चार हुतात्मा पुतळ्यापासून सायकल रॅलीस सुरुवात झाली. पुढे पार्क चौकातून यू-टर्न घेऊन सरस्वती चौक, नवीपेठ पोलिस चौकी. रेल्वे स्टेशन, सात रस्ता, गुरुनानक चौक, संत तुकाराम चौक, अशोक पोलिस चौकी मार्गे शहर पोलिस मुख्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. 'चला सायकल चालवू या, आरोग्य जपूया' असा संदेश रॅलीतून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.